श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी ‘एक राखी आम्ही लावलेल्या झाडासाठी – एक राखी आपल्या सैनिकासाठी ‘ हा पर्यावरणीय उपक्रम उत्साहात संपन्न

प्रतिनिधी :- केम येथे श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी ‘ एक राखी आम्ही लावलेल्या झाडासाठी – एक राखी आपल्या सैनिकासाठी ‘ हा पर्यावरणपूरक उपक्रम आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री सुभाष कदम हे होते.
या कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी या कॉलेजमधील विद्यार्थिनींनी गेल्या वर्षी लावलेल्या जवळपास १०० झाडांची पूजा करून त्या झाडांना राख्या बांधल्या. तसेच उपस्थित विद्यार्थी बांधव, प्राध्यापकवर्ग व सन्माननीय पाहुण्यांना देखील राख्या बांधल्या. यावेळी आपल्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना राख्या पाठवण्यात आल्या.

या कार्यक्रमात केवळ वृक्षारोपण करणे ह्याच्या सोबतच वृक्ष संवर्धन करणे हे महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य आहे. अशा उपक्रमातून आपण स्वतः लावलेल्या झाडांना आपला भाऊ मानून त्याची सर्वतोपरी काळजी घेणे हा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे , प्रा. संतोष साळुंखे , प्रा.संतोष रणदिवे, प्रा. सतीश बनसोडे हे उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज