पार्श्वगायक प्रवीण अवचर यांचा प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान तर्फे करमाळा येथे सत्कार

प्रतिनिधी :-करमाळा तालुक्यातील मांगी गावचे सुपुत्र प्रवीण अवचर हे नुकतेच बँकॉक थायलंड येथून त्यांच्या प्रोग्राम चा यशस्वी दौरा करून भारतामध्ये आलेले आहेत . त्यांना पुणे येथील अगरवाल समाज फेडरेशन गोल्डन क्लब यांच्यातर्फे उत्कृष्ट गायक म्हणून सन्मानित करण्यात आले. याबद्दल करमाळा येथील प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदास कांबळे व त्यांच्या प्रतिष्ठानचे सदस्य यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला .यावेळी करमाळा येथील दोस्ती बँड चे मो. हुसैन कुरेशी ,अजहर कुरेशी ,अलीम कुरेशी, पत्रकार प्रफुल्लकुमार दामोदरे, पत्रकार अलीम भाई . दोस्ती बँजो ग्रुपचे अदनान शेख, सद्दाम कुरेशी सह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकार अलीम भाई यांनी प्रवीण अवचर यांनी मिळवलेल्या यशाचे भरभरून कौतुक करत त्यांच्या गायनाची व त्यांच्या जिद्दीचा नवोदित कलाकारांनी नक्कीच आदर्श घ्यायला हवा. बँड पासून आपल्या गायनाची सुरूवात करत आज प्रवीण अवचर हे यशाच्या शिखरावरती जाऊन पोहोचलेले आहेत.

गेले वीस पंचवीस वर्षापासून कलाक्षेत्रात आपली कला सादर करत आहेत .त्यांनी देश- विदेशामध्ये भारतीय फिल्म इंडस्ट्री मधील अनेक दिग्गज पार्श्वगायकांबरोबर आपले कार्यक्रम सादर केलेले आहेत. नक्कीच तालुक्यातील एक कलाकार एक मित्र म्हणून आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे . असे पत्रकार अलीम भाई यांनी व्यक्त केले .

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज