सावधान फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम , वरील अकाउंट हॅक करून आपल्या नावे पैसे मागितले जाऊ शकतात

प्रतिनिधी :- सध्या वयाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व स्तरातून सोशल मीडियाचा प्रचंड वापर होत आहे.याचाच फायदा घेऊन हॅकर लोक नवनवीन पद्धतीने सोशल मीडियाचा वापर करून व लोकांचे फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप अकाउंट हॅक करून आर्थिक फसवणूक करत आहेत. तरी कृपया या सर्व गोष्टींपासून आपण सावधान राहावे व इतरांनाही सावधान करावे.

सध्या सोशल मीडियातून इंडियन आर्मी भारतीय सैन्यातील उच्च अधिकार्‍यांची नावे घेऊन किंवा त्यांचे अकाउंट हॅक करून तुम्हाला त्यांच्याकडून अगोदर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात येते यावरती आर्मी ऑफिसर चे फोटो आणि त्यांचे अकाउंट डिटेल असल्यामुळे आपण ती फ्रेंड रिक्वेस्ट पटकन एक्सेप्ट करतो व, या नंतर काही दिवसांनी हॅकर कडून मेसेज फोन करण्यात येतो . विशेष म्हणजे यामध्ये हॅकर ज्या नंबर वरून फोन करतात त्याच अधिकाऱ्याचं नाव येते त्यामुळे आपला पटकन विश्वास बसतो व त्याकरकडून सांगण्यात येते की माझी अचानक बदली झाल्यामुळे मला माझ्या आर्मी क्वार्टर मधील घरातील अगदी दोन-तीन महिन्यापूर्वी विकत घेतलेले नवीन फर्निचर विकायचे असून. यासाठी हॅकर लोक तुम्हाला फोन करतात व तुमचे व्हाट्सअप वरती त्या फर्निचर च्या वस्तूंचे फोटो पाठवतात आणि तुम्हाला सांगतात की ताबडतोब आमच्या अकाउंटला सामानाचे अगोदर फक्त ॲडव्हान्स म्हणून 10 /20 हजार रुपये पाठवा व तुम्हाला सामान मिळाल्यानंतर बाकीचे पैसे पाठवा आणि हे सामान आम्ही आमच्या आर्मीच्या गाडीमध्ये तुमच्या घरपोच फ्री होम डिलिव्हरी करतो आहे .

अशाप्रकारे आजपर्यंत हजारो लोकांची फसवणूक करण्यात आलेले असून पैसे उखळण्यात आलेले आहेत. तरी याविषयी आम्ही सविस्तर माहिती घेतली असता आम्हाला पोलिसांकडूनही याबाबतीत दुजाेरा देण्यात आला व असे अनेक प्रकारचे गुन्हे उघडकीस आलेले असून सर्वांनी या गोष्टीची सावधानता बाळगावी व फेसबुक ,इंस्टाग्राम व्हाट्सअप, वापरताना आपले अकाउंट हॅक होऊ नये याची दक्षता घ्यावी किंवा असे झाल्यास ताबडतोब पोलिसांना कळवावे मागील काही महिन्यापूर्वी अशाच प्रकारे वीज वितरण कंपनीचे अकाउंट हॅक करण्यात आले होते व त्यांच्याकडून वीज ग्राहकांना मेसेज करण्यात येत होते की तुमचे लाईट बिल थकले असल्यामुळे तुमचं कनेक्शन कट होणार आहेत ताबडतोब या अकाउंटला पैसे भरा . यातूनही लाखो लोकांची फसवणूक करण्यात आली होती. तरी आपण याबाबतीत सतर्क राहून सोशल मीडियातून जनजागृती करावी.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज