स्पर्धा विश्व अभ्यासिका,माळशिरस (संचालक- विनायक शिंदे)

प्रतिनिधी :   स्पर्धा विश्व अभ्यासिका याची स्थापना 27 मार्च 2017 रोजी करण्यात आली आहे. स्पर्धा विश्व अभ्यासिकेचे संचालक विनायक शिंदे यांनी माळशिरस तालुक्यातील पहिली अभ्यासिकेची निर्मिती केली. या अभ्यासिके मार्फत यापूर्वी 15 ऑगस्ट 74 वा स्वातंत्र्यदिना चे औचित्य साधून विनायक शिंदे यांनी वृक्षारोपण सारखा उपक्रम घेऊन त्याच बरोबर नेत्र तपासणी शिबीर अशा अनेक सामाजिक उपक्रम राबविले. नुकता 27मार्च 2023 रोजी सहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

या अभ्यासिकेचं मुख्य महत्व म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेला पात्र असणाऱ्या मुख्य परीक्षा पर्यंत अभ्यासिका मोफत असते. सोबतच गट ब ला पात्र होणाऱ्या विध्यार्थ्यास 50 टक्के फी सवलत देण्यात येते. माजी सैनिक यांना अभ्यासिका मोफत असते त्याचबरोबर 50 टक्के अपंग असणाऱ्यांना फी मध्ये 50 टक्के सवलात देण्यात येते.

अभ्यासिकेचे काही वैशिष्टे देखील आहेत
माळशिरस शहराच्या, मध्यवार्ती ठिकाणी , मुलींना स्वातंत्र्य बैठक व्यवस्था, पार्किंग सुविधा , शांत व प्रसन्न वातावरण, फिल्टर चे पाणी, प्रत्येकाला स्वातंत्र्य कंपार्टमेंट , वाय फाय, पेपर वाचन व जेवणासाठी स्पेशल हॉल अशा अनेक सुविधा ते या अभ्यासिकेमध्ये पुरवत असतात.
या स्पर्धेच्या काळात, महागाईच्या काळात विध्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणारी व अशा स्वातंत्र्य सवलत देणारी, विद्यार्थ्यांचे हितं ह्या दृष्टिकोनातूम निर्माण केलेली महाराष्ट्रातील एकमेव अभ्यासिका म्हणजे स्पर्धा विश्व अभ्यासिका (संचालक – विनायक शिंदे).

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज