प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन

अकलूज (प्रतिनिधी):कला,क्रीडा,सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात लौकिक प्राप्त केलेल्या शंकरनगर येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने दिनांक २३,२४ व २५ डिसेंबर २०२३ या कालावधीत शालेय मुला-मुलींच्या व खुल्या गटासाठी राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी दिली.

श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त सदरच्या राज्यस्तरीय समुहनृत्य स्पर्धा स्मृतीभवन शंकरनगर येथे आयोजित केल्या आहेत.

शालेय मुला मुलींच्या सुप्त गुणांना चालना देऊन ते भावी जीवनात यशस्वी कलाकार बनावेत या उद्देशाने प्रताप क्रीडा मंडळ अशा स्पर्धेचे आयोजन करत असते.प्रताप क्रीडा मंडळाने अनेक नामवंत कलाकार,दिग्दर्शक,तंत्रज्ञ,नृत्य कलाकार निर्माण केले असून आज ते विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

या वर्षीच्या स्पर्धेत एकूण सहा गट असून गट १ ला इयत्ता पहिली ते चौथी कॅसेट गीत,गट २ रा इयत्ता पाचवी ते सातवी कॅसेट गीत (पारंपारिक लोकनृत्य),गट ३ रा इयत्ता आठवी ते दहावी कॅसेट गीत (बॉलिवूड डान्स),गट३ रा इयत्ता आठवी ते दहावी कॅसेट गीत (पाश्चिमात्य नृत्य शहरी),गट ४ था इयत्ता पाचवी ते दहावी कॅसेट गीत (प्रासंगिक नृत्य संवाद थीम डान्स),गट ५ वा इयत्ता अकरावी ते सर्व महाविद्यालयीन गट (प्रासंगिक नृत्य थीम डान्स) आणि गट ६ वा व्यावसायिक गट (खुला) समूह नृत्य स्पर्धा (रेकॉर्ड डान्स) या सहा गटांचा या मध्ये सहभागी आहे. सहा गटात एकूण १२४ गीतांनी नाव नोंदणी केली आहे.

शालेय शहरीगट,ग्रामीणगट व अति ग्रामीणगट या तिन्ही गटासाठी स्वतंत्र रोख रक्कम , स्वतंत्र सर्वसाधारण विजेतेपद व फिरते चषक आणि खुल्या गटासाठी प्रथम बक्षीस रुपये १५हजार व सन्मान चिन्ह, द्वितीय रुपये १३ हजार व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांक रुपये११हजार व सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ तीन पुरस्कार प्रत्येकी एक हजार रुपये व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.या स्पर्धेतील सर्व कलावंतांना सहभाग प्रमाणपत्र ही देण्यात येणार आहे.यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील,सचिव बिभीषण जाधव, स्पर्धा प्रमुख मुख्याध्यापक संजय गळीतकर,पोपटराव देठे,डॉ. विश्वनाथ आवड, अमोल फुले उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज