सावधान ! ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ वर होणार कारवाई

अकलूज ता २६: अकलूज पोलीसांकडून ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालविणे, कर्णकर्कश डिजे लावून सामाजिक शांतता बिघडवणाऱ्यांवर अंकुश बसावा यासाठी सोमवार (ता.२५) रोजी पासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

      नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने ३१ डिसेंबरला अनेक जण मद्यपान करून वाहन चालवतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने फक्त ३१ डिसेंबर रोजी कारवाई करण्यापेक्षा सोमवारपासून दररोज कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर परिसरातील सुमारे सहा ‘डिजे’वर फक्त दंडात्मक कारवाई न करता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच यापुढे कोणत्याही प्रकारचा डीजे लावण्यात आला तर त्यावरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.

दारू नका दूध प्या..

अकलूज पोलीस स्टेशनच्यावतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी ‘दारू नका दूध प्या’ चा संदेश देण्यासाठी महर्षी चौकात चालकांना दुधाचे वाटप करण्यात येणार आहे.

नववर्षाचे स्वागत करताना शांततेने व संयमानी करावे. कायदा व सुव्यवस्थेस बाधा आणणार्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज