स्वस्त धान्य दुकानदार यांचा मनमानी कारभार थांबला पाहिजे अन्यथा युवा सेना करणार आंदोलन

वार्ताहार :शिवसेना व युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके यांच्या वतीने माळशिरस तालुक्यातील स्वस्त धान्य दुकान दारांचा मनमानी कारभार त्वरित थांबवण्यात यावा अन्यथा युवा सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार या विषयीचे चे निवेदन नायब तहसीलदार अमोल कदम यांना देण्यात आले.माळशिरस तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार शासनाच्या नियमावलीचे उल्लंघन करून सर्वसामान्य नागरिकास वेठीस धरून मनमानी पद्धतीने मुजोर पद्धतीचे वर्णन करून नियमभाह्य पद्धतीने दुकान चालवत आहेत काही रेशन दुकानदार महिन्यातील दोनच दिवस दुकान चालू ठेऊन इतर दिवशी दुकान बंद ठेवत आहेत.शासनाचा दुकानातील उर्वरित माल दहा रुपये पंधरा रुपये विस रुपये दराने जसे पैसे निघलतील तश्या पद्धतीने ते माल बेकायदीर रित्या विकत आहेत सदर रेशन दुकानदार कुठल्याही लाभार्थ्यास मशीन मधून निघणारी पावती देत नाहीत लाभार्थाला मालाचे प्रमाण दाखवत नाहीत मूळ मुद्दा की पूर्ण महिनाभर दुकान चालू ठेवत नाहीत तसेच दुकान चालू ठेवल्याचे दिवसा वेतिरिक्त आलेल्या ग्राहकास त्याच्या हक्काचा माल देत नाहीत .सदर घटनेची गांभीर्याने चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेने केली आहे अन्यथा युवा सेना रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करील असा इशारा युवा सेनेने दिला आहे .

यावेळी निवेदन देताना शिवसेना उपतालुका प्रमुख महादेव बंडगर युवा सेना विधानसभा तालुका प्रमुख मयूर सरगर शिवसेना शहर प्रमुख माळशिरस अशोक देशमुख युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता भाऊ साळुंखे रामभाऊ कचरे युवराज पवार दत्तात्रय काशीद इ शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज