तानाजी गोडगे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी :-ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांचे वतीने 2023 चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जि. प. प्रा .शाळा पवार वस्तीचे उपक्रमशील शिक्षक श्री. तानाजी गोडगे यांना माननीय श्री .शिरीष सरदेशपांडे साहेब पोलीस अधीक्षक सोलापूर यांचे शुभहस्ते देण्यात आला.

सध्या जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट असताना सुद्धा गेली 25 वर्षे जिल्हा परिषद शाळेत सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शाळेचे नावलौकिक वाढवण्यात गोडगे सरांचे योगदान फार मोठे असल्याचे सांगण्यात आले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची शंभर टक्के गुणवत्ता ठेवणे, शालेय व सहशालेय उपक्रम राबवणे, शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकतात, डिजिटल स्कूल, ज्ञानरचनावादी शिक्षण, ई लर्निंग सुविधा, संगणक शिक्षण ,पालकांचे शिक्षणात योगदान, विज्ञान प्रदर्शन, दोन्ही हाताने लेखन करणे, मनकवड्या, सीआयडी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तज्ञ मार्गदर्शक ,असे विविध उपक्रम शाळेत राबवत असताना त्यांचे सामाजिक कार्य ही उल्लेखनीय आहे म्हणून त्यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.

माननीय श्री. शेख साहेब तहसीलदार बार्शी, सुनील खामीतकर साहेब समाज कल्याण अधिकारी सोलापूर, श्री जालिंदर नालकुल साहेब पोलीस उपविभागीय अधिकारी बार्शी, संतोष गोसावी साहेब पोलीस निरीक्षक बार्शी, अण्णासाहेब मांजरे पीआय बार्शी ,बाळासाहेब चव्हाण मुख्याधिकारी नगरपालिका बार्शी, अनिल बनसोडे साहेब प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग बार्शी, संजय पाटील साहेब, अजित दादा कुंकूलोळ अमृता नाना राऊत, शशांक गुगळे, सचिन वायकुळे सर, सतीश अंधारे, राहुल वाणी ओन्ली समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष, संतोष शेळगावकर उपाध्यक्ष व संस्थेचे सर्व अधिकारी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच असंख्य विद्यार्थी, पालक, शिक्षण प्रेमी नागरिक यांच्या साक्षीने दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज