प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की जिद्द, धाडस आणि मनोबलाच्या जोरावर यश मिळतेच – उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कावरे

पुणे (चिंचवड)-: मानवी आयुष्यात जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते,तेव्हांच प्रत्येकामध्ये जिद्द, धाडस, आणि निर्माण झालेल्या परिस्थितीला निकराने तोंड देण्याचे मनोबल तयार होते” असे प्रतिपादन पुण्याच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कावरे यांनी बुधवारी चिंचवड येथे केले. त्या सौ.ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व ज्यु.काॅलेजच्या वतीने आयोजित केलेल्या १९ व २०डिसेंबर २०२३ या दोन दिवसीय स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रमात बोलत होत्या.या वेळी श्री.जैन विद्या प्रसारक मंडळाचे मानद सचिव अॅड राजेंद्रकुमार मुथा सहाय्यक सचिव प्रा.अनिलकुमार कांकरिया, राजेशकुमार सांकला, पुणे मेट्रोचे सल्लागार शिवाजीराव चाफेकरंडे,कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत भन्साळी, समुपदेशक डॉ.सौ.अर्चना क्षिरसागर, प्राचार्या सौ.सारंगा भारती, मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयाचे प्रा .संजयकुमार कांबळे,नविनचंदजी लुंकड, प्रकाश बंब, प्रशासन अधिकारी सतीश भारती, उपमुख्याध्यापिका सुषमा बंब, पर्यवेक्षक दिपक थोरात,विभाग प्रमुख विनायक थोरात आदी मान्यवरांसह इतर शाखांचे प्राचार्य , मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थीनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व नवकार मंत्रांच्या पठणाने झाली.

महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.भारती यांनी पी.पी.टी. माध्यमाद्वारे प्रास्ताविक सादर केले.

स्नेहसंमेलनाच्या उद् घाटन प्रसंगी बोलताना श्री.चाफेकरंडे म्हणाले की, आज शाळांमधून विद्यार्थ्यांना ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान कौशल्यांसोबतच चांगल्या संस्काराचे धडे देणे ही काळाची गरज झालेली आहे . त्यासाठी आपली अल्पसंख्याक जैन समाजाची असणारी ही शाळा विद्यार्थ्यांना सर्व धर्माची,समभावाची शिकवण देण्यासाठी, त्यांचे सण व उत्सव आनंदाने साजरे करते ही खूपच आनंददायी व वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.

यावेळी विद्यार्थीनींना व पालकांना “आहार व व्यायाम” या विषयी मार्गदर्शन करताना, डॉ.क्षिरसागर म्हणाल्या की,मानवी मनाचा, बुद्धीचा आणि शरीराचा समतोल विकास साधण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने घरी बनविलेले अन्न खाण्यास प्राधान्य दिले पाहिजे. आज बाहेरील अन्नपदार्थ मागवून खाण्याचा तसेच हाॅटेलमध्ये जाऊन पार्ट्या करण्याचा प्रघात घरोघरी दिसून येतोय. मसालेदार,तिखट,तेलकट व चमचमीत पदार्थ आपण वेळी – अवेळी अमर्याद खाऊन अनेक आजारांना आमंत्रण देत आहोत.त्यासाठी छोटेमोठे कार्यक्रम, मुलांचे वाढदिवस पालकांनी घरीच साजरे करावेत.दिवसांतून किमान एक तास व्यायाम करावा.सोशल मिडीयात रममाण होण्यापेक्षा ध्यानधारणा व प्राणायाम केला पाहिजे.तरच आपण महिलांची व नवीन पिढीची सर्वांगीण प्रगती करू शकू.

श्रीमती कावरे विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, आपल्या समोर जेव्हा प्रतिकूल परिस्थितीचे वादळ निर्माण होते, तेव्हा आईवडील व गुरूजनांनी केलेल्या संस्काराचे व उपदेशाचे स्मरण करून प्रयत्नपूर्वक लढले पाहिजे.जगात या तीन हितचिंतकाशिवाय चांगला सल्ला ‌तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही, आणि तो तुम्ही मानला तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. स्नेहसंमेलनात विद्यार्थीनींनी किर्तन, एकांकिका, शाहिरी कवण,पंढरीची वारी, ग्रामीण परंपरा व चालीरीती,लावणी ,नृत्य आविष्कार आदी  विविध गुणदर्शनाचे सादरीकरण केले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलींचा सत्कार पदके, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्वाती नेवाळे यांनी केले तर आभार मनीषा लोखंडे यांनी मानले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज