टेंभुर्णौच्या आठवडा बाजारात भटक्या जनावरांचा धुमाकूळ, सत्ताधारी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

 प्रतिनिधी -माढा तालुक्यातील टेंभुर्णो हे शहर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोक संख्येच्या दृष्टिने झपाट्याने वाढत असलेले जिल्ह्य़ातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. या शहरातून अनेक राज्यांत विविध वाहनांची ,बस,ट्रॅव्हल्स, सह अन्य खासगी वाहतुकीची सोय असल्यामुळे हे शहर राज्याच्या नकाशावरील महत्वाचे शहर आहे. या शहराचे खास वैशिष्ठ्य म्हणजे सर्वात मोठी बाजार पेठ असुन शहराच्या आजुबाजुस अनेक खेड्यांची दळणवळणाच्या बाबतीत मोठी वर्दळ असल्याने अर्थिक बाब हि खंबीर मानली जाते. यावर न थांबता येथे भरविण्यात येणारा आठवडा बाजार हि अर्थिक दृष्टिने महत्त्वपूर्ण मानला जातो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या तिजोरीत अर्थिक भर पडण्यास मदत होत आहे.

     

         एवढे सर्व वैभव या शहराने मिळवून देऊन सुध्दा कोणत्याच राजकीय गटाकडून विविध विकास कामांवर भर दिला नाही. त्यामुळे येथील जनता राजकीय कुरघोडीत गुदमरत आहे.आशातच शहरातून मोठय़ाप्रमाणात भटक्या जनावरांचा वावर होत आहे. जवळपास शंभरहून अधिक जनावरे हि शहराच्या विविध भागातून धुमाकूळ घालत असुन याचा नाहक त्रास जनतेला होत आहे. त्यातच बाजारात हि यांची दहशत असल्याचे दिसून येते मोठय़ा प्रमाणात भाजी पाल्याचे नुकसान हि होत आहे .हे सर्व कुठेतरी थांबावे यासाठी सर्वच स्तरातून सत्ताधारी ग्रामपंचायतीकडे साकडे घालण्यात येत आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज