टेंभुर्णी ते जातेगाव महामार्गाचे काम लवकरच सुरु होणार

प्रतिनिधी :-केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी जी यांनी जातीने लक्ष घालून खूप दिवसांपासून प्रलंबित असलेला टेंभुर्णी ते जातेगाव या महामार्गाचे 45 मीटरचे राजपत्र प्रसिद्ध करून या महा मार्गातील सर्व अडथळे दूर करून करमाळा तालुक्याचे फार मोठे काम केलेले आहे .त्यासाठी करमाळ्याचे सुपुत्र मा. केंद्रीय मंत्री संजय धोत्रे साहेब यांचे स्वीय सचिव श्रीयुत प्रतीक नाथाजी शिंदे यांनी अथक प्रयत्न केले होते. म्हणून प्रतीक शिंदे यांनी काल माननीय गडकरी साहेब यांची समक्ष भेट घेऊन व त्यांना करमाळ्याच्या आई कमला भवानी मातेची भव्य अशी प्रतिमा , शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. त्यावेळी गडकरी साहेबांचे शासकीय स्वीय सहाय्यक श्रीयुत दिपक शिंदे साहेब आणि श्रीयुत अमोल बिराजदार हेही उपस्थित होते.

           सदर महामार्गा बाबत काही अडचण आल्यास आपण बिराजदार यांना सांगावे. त्या सर्व अडचणी बिराजदार साहेब यांनी सोडवाव्यात असे निर्देश गडकरी साहेब यांनी बिराजदार यांना दिले. त्यामुळे टेंभुर्णी ते जातेगाव या महामार्गाचे कामामध्ये आता कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करमाळा तालुकावासियांनी सर्वांनी बाळगावी असे आवाहन श्री प्रतीक शिंदे व गुलाबराव बागल सर यांचे तर्फे करण्यात येत आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज