पुण्याचा ए. सी.ए संघ उद्योग महर्षी चषकाचा मानकरी ; सातारा जिमखान्याला हरवत पटकावले 51 हजाराचे पारितोषिक

अकलूज: येथील उद्योग महर्षी राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात ए.सी.ए.पुणे संघाने सातारा जिमखाना संघाचा ६६ विरूद्ध ५९ असा ७ गुणानी पराभव करीत विजेतेपद पटकाविले.पुणे संघाला उद्योग महर्षी चषका सह रोख रु.५१ हजार पारितोषक देण्यात आले.

 

विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुलात उद्योग महर्षी कै.उदयसिंह मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने मित्र मंडळ,महर्षी जिमखान स्पोर्ट्स असोसिएशन, माळशिरस तालुका बास्केटबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १५ अक्टोंबर २०२३ दरम्यान उद्योग महर्षी चषक राज्यस्तरीय बास्केटबाॅल स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम सामना ए.सी.ए.पुणे विरूद्ध सातारा जिमखाना यांच्यात अटीतटीचा होवुन पुणे संघाने सातारा संघावर ७ गुणांनी विजय मिळवित उद्योग महर्षी चषकावर नाव कोरले. स्पर्धेत उत्कृष्ठ खेळाडूचा मानकरी छत्रपती संभाजीनगरचा पियुष पिडेकर ठरला त्यास रोख रु.३ हजार व ट्रॉफी देण्यात आली.

 

तत्पुर्वी तिस-या व चौथ्या क्रमांकासाठी जयहिंद क्लब कडा-बीड विरुध्द चॅम्पियन्स क्लब छत्रपती संभाजीनगर यांच्यातील लढतीत जयहिंदने चॅम्पियन्सचा ५३ विरूद्ध ४५ असा ८ गुणांनी पराभव करीत तृतीय क्रमांक प्राप्त केला.जयहिंदला तृतीय,क्रमांकाचे २१ हजार व चॅम्पियन्स संघाला चतुर्थ क्रमांकाचे ११ हजार पारितोषक देण्यात आले.आज सकाळी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ए.सी.ए. पुणे विरुध्द जयहिंद कडा-बीड दरम्यानच्या सामन्यात ए. सी.ए.पुणेने जयहिंदचा ६९ विरूद्ध ५३ असा १६ गुणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली तर सातारा जिमखाना विरुद्ध चॅम्पियन्स क्लब छत्रपती संभाजीनगर सामन्यात सातारा जिमखान्याने चॅम्पियन्सला ६६ विरूद्ध ५५ असा ११ गुणानी पराजित करीत अंतिम फेरी गाठली.

 

अंतिम फेरीतील विजेता ए.सी.ए संघास ५१ हजार व उद्योग महर्षी चषक उपविजेता सातारा जिमखाना संघाला ३१ हजार व चषक असे पारितोषिक आ.राम सातपुते यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, शिवशंकर बझारच्या चेअरमन डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, स्वरुपाराणी मोहिते पाटील, ईश्वरीदेवी मोहिते पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील ॲड.नितीन खराडे, बास्केटबॉल कोच अनिल जाधव यांच्यासह मित्रमंडळ, असोसिएशनचे, शिवरत्न बास्केटबॉल अकॅडमीचे सर्व खेळाडूं पदाधिकार,कार्यकर्ते उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ श्री महेश ढेंबरे, शिवाजी गोडसे, प्रदीप पांढरे, शशांक गायकवाड , रोहित पवार, निखिल भोसले, रोहित वाघमारे, कुमार जाधव, ओंकार पांढरे,अनिल उघडे, राहुल बोबडे, प्रकाश गायकवाड, कुलदीप पाटील, दिग्विजय खराडे, मनोज क्षीरसागर, नागेश बनकर, नाना साळुंखे,राहुल नागणे, सचिन नरसाळे, चंदन कोतमीरे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज