उद्योगमहर्षि कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या जयंती निमित्त श्री क्षेत्र आनंदी गणेश येथे वृक्षारोपण

अकलूज : महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन संघाचे माजी अध्यक्ष उद्योगमहर्षि कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या जयंती निमित्त श्री क्षेत्र आनंदी गणेश येथील बॉटनीकल गार्डन येथे औषधी झाडांचे रोपण शिवशंकर बझारच्या चेअरमन डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पं.स.चे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, देवन्या मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, अ‍ॅड.नितीन खराडे, राजेंद्र घोरपडे, भिमराव रेडे, तानाजी भगत, सोमनाथ मुंडफणे, अनिल जाधव, विनायक केचे, तानाजी भोळे, भाऊ पवार, राजु चव्हाण, गणेश निंबाळकर, दिपक शेंडगे, विराज निंबाळकर, विनायक पराडे, शिवशंकर बझारचे व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख, शिवरत्न कन्स्ट्रक्शनचे नरसिंह करडे, अनिल उघडे, राहुल बोबडे, प्रकाश गायकवाड, प्रितम एकतपुरे, मनोज क्षीरसागर, नागेश बनकर, सचिन नरसाळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

तत्पुर्वी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व उपस्थित मान्यवरांनी श्री क्षेत्र आनंदी गणेश येथील उद्योग महर्षि कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या शक्तीस्थलावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज