उद्योगमहर्षि उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या जयंती निमित्त संस्कृत स्तोत्र पठण व महिलांसाठी मोफत योग शिबीराचे आयोजन

अकलूज : उद्योगमहर्षि कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्था आनंदनगरच्या वतीने संस्कृत स्तोत्र पठण व महिलांसाठी मोफत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवरत्न उद्योग समुहाचे चेअरमन कीर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील व माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.

रविवार दि.24 सप्टेंबर रोजी उद्योगमहर्षि कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या 64 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून अकलूज येथील विठ्ठल मंदिर येथे संस्कृत स्तोत्र पठण, विष्णु सहस्त्रनाम, स्त्री सुक्त इ पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संत तुकाराम महाराज याचे 10 वे वंशज व श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू चे अध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज देहुकर हे उपस्थित असणार आहेत. तसेच यावेळी शिवशंकर बझारच्या चेअरमन डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याबरोबरच परिसरातील महिलांचे आरोग्य निरोगी रहावे या दृष्टीने मोफत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरात सहभागी होण्यासाठी शिरीष देशपांडे 7709474111, भागवत काका 9637054954, दीपराज माने देशमुख 9423015550, रणजित चव्हाण 7301893333 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने श्री क्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्था व शिवकिर्ती युवा मंचच्या वतीने अकलूज नगरपरिषदेच्या सभागृहात दि.25 सप्टेंबर रोजी अकलूज-माळेवाडी परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज