उजनी धरणात पाणी सोडा युवा सेनेचा सोलापूर पुणे महामार्गावर रस्ता रोको

पुणे जिल्ह्यातिल सर्व धरणातील मिळून उजनीत दहा टीएमसी पाणी सोडण्याची केली मागणी

सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र विजयसिंह मोहिते -पाटील यांनी या आधी विस वर्षा पूर्वी पुणे जिल्ह्यातील सर्व धरणातील मिळून दहा टीएमसी पाणी उजनी धरणात सोडले होते. त्यांचा आदर्श घेऊन अजित दादा पवार साहेब ,पालकमंत्री चंद्रकांत पाटील ,सोलापूर जिल्ह्याचे आमदार खासदार या सर्वांनी मिळून उजनी धरणात दहा टीएमसी पाणी आणावे – गणेश इंगळे युवा सेना जिल्हा प्रमुख

प्रतिनिधी :-शिवसेना युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या आदेशाने युवासेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे व सचिन बागल युवासेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या वतीने उजनी धरणात दहा टीएमसी पाणी सोडावे यासाठी शिराळ (टें) येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माढा तहसीलदार विनोद रणवरे साहेब व टेंभुर्णीचे पी.आय दीपक पाटील साहेब यांनी निवेदन स्विकारले . यावेळी गणेश इंगळे ,सचिन बागल, किशोर देशमुख, महादेव बंडगर, सुरेश लोंढे यांनी आपले मनोगत मांडले .सध्या उजनी धरण हे मायनस मध्ये गेलेले असून उजनी धरणावरती अवलंबून असणारी शेती तसेच सोलापूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील  कर्जत, जामखेड, धाराशिव, सोलापूर, इंदापूर, बारामती शहरासह सोलापूर जिल्ह्यातील शंभरहून अधिक ग्रामपंचायती व नगरपालिकांचा पाणीपुरवठा उजनी धरणावर अवलंबून आहे. त्या पाणीपुरवठा योजना बंद पडतात त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक वसाहतींना तर पुणे जिल्ह्यातील काही एमआयडीसींना उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो. त्याही सर्व योजना बंद पडतात. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, त्यामुळे भामा आसखेड कळमोडी व इतर धरणातून पाणी उजनी धरणात दहा टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात येत आहे.अन्यथा उजनी धरणात पाणी नाही सोडले तर यापेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला.

       यावेळी महादेव बंडगर, पिंटू तात्या चव्हाण,   सुरेश लोंढे, सोमनाथ ढवळे, सचिन इंगळे ,सिद्धेश्वर जाधव, जयदेव पवार ,शंभूराजे फुगे, स्वप्निल गवळी, तुकाराम पाटील, विठ्ठल आबा मस्के, गुणा वाघ, गणेश लोकरे, महादेव लोकरे, नवनाथ जगताप, विनोद निर्धार ,विजय गायकवाड ,विठ्ठल मेटे, दत्ता भाऊ मिटकल, समाधान चव्हाण, पप्पू लोकरे, दतात्रय साळुंखे, जयसिंह गायकवाड, विशाल गायकवाड, गणेश आबा गायकवाड, गणेश साळुंखे, जगदीश मस्के, रणजित पवार, अण्णा मस्के, शिवाजी मिसाळ, नितीन चव्हाण, अण्णा घोडके ई. शिवसैनिक व युवा सैनिक व शेतकरी उपस्थित होते .

 

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज