पुणे जिल्ह्यातील धरणामधील दहा टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्यात यावे : युवा सेनेची मागणी

पुणे जिल्ह्यातील सर्व धरणातील पाणी उजनी धरणात दहा टीएमशी सोडण्यात यावे यासाठी युवा सेनेच्या वतीने सोमवार दि 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता शिराळ टें ता माढा येथे पुणे सोलापूर हायवे वरती रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार : गणेश इंगळे युवा सेना जिल्हा प्रमुख

प्रतिनिधी : शिवसेना युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या आदेशाने युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व युवा सेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या वतीने निवासी उपजिल्हा अधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी या निवेदनात पुणे जिल्ह्यातील सर्व धरणामधील मिळून दहा टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्यात यावे अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली .सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र विजयसिंह मोहिते पाटील यांनी या आधी पुणे जिल्ह्यातील धरणातील पाणी उजनी धरणात सोडण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून दहा टीएमसी पाणी उजनी धरणात सोडले होते .त्यांचाच आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांनी सर्वांनी मिळून प्रयत्न करून दहा टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्यास यावे .

पुणे, सोलापूर, अहमदनगर, धाराशिव या जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा जानेवारी महिन्यातच उणे झाला आहे. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दहा वर्षांनंतर अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. धरणातील साठा उणे झाल्यानंतर उजनीवरील बहुतेक पाणीपुरवठा योजना बंद पडतात. त्यामुळे आता प्रशासनाला पाण्याचे ठोस नियोजन करावे लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक वसाहतींना तर पुणे जिल्ह्यातील काही एमआयडीसींना उजनीतून पाणीपुरवठा होतो.

कर्जत-जामखेड, धाराशिव, सोलापूर, इंदापूर, बारामती शहरासह सोलापूर जिल्ह्यातील 100 हून अधिक ग्रामपंचायती व नगरपालिकांचा पाणीपुरवठा उजनीवरच अवलंबून आहे. पुणे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीला उजनीचा मोठा आधार आहे. आता जानेवारीतच उजनी धरण उणे झाल्याने आगामी साखर हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होणार हे निश्‍चित. पुढच्या वर्षी सुपर अलनिनो वादळामुळे पावसाळा काही दिवस लांबणीवर पडू शकतो, असा हवामान खात्याचा पूर्वीचाच अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाला उजनीतील पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागेल; अन्यथा पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न गंभीर होऊ शकतो. यावेळी निवेदन देताना युवा सेना उपशहर प्रमुख राम कांबळे, युवा सेना तालुका सरचिटणीस सोमनाथ ढवळे, अमोल पाटील ,दिनेश आंबेवले, विशाल तयावाले, राजेश चौधरी, गणेश तयावाले, अजय कांबळे, दिनेश तयावाले इ.युवा सैनिक उपस्थित होतो.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज