उंदरगांव ते उपळाई(पालखी मार्ग)रस्त्या संदर्भात उंदरगांव येथील उपोषणची आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली दखल 

प्रतिनिधी :- उंदरगांव येथे 30-40 वर्षे प्रलंबित असलेला उंदरगांव ते उपळाई(पालखी मार्ग)रस्त्या संदर्भात उंदरगांव येथे ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने तालुक्याच्या सत्ताधार्यांच्या विरोधात साळखी उपोषण सुरू होते.सदर उपोषणास सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे माजी चेअरमन भारत(नाना)पाटील यांनी भेट दिली व सदर उपोषण करते यांच्या समवेत चर्चा झाल्यानंतर आमदार रणजितसिंहजी मोहिते-पाटील यांना फोन लावुन सदर उपोषण करते यांच्या समवेत आमदार रणजितसिंहजी मोहिते-पाटील यांची चर्चा करून दिल्या नंतर .सदर उपोषणाची आमदार रणजितसिंहजी मोहिते-पाटील यांनी तात्काळ दखल घेतली व सकारात्मक चर्चा झाल्यानंतर भारत(नाना)पाटील यांच्या हस्ते उपोषण करत्यांनी उपोषण सोडले व उंदरगांव ग्रामस्थांच्या वतीने आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे मनपूर्वक आभार मानले.यावेळी कुर्डुवाडी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री.हांडे साहेब,कनिष्ठ अभियंता जावळकोटे मॅडम,आलेगांवचे माजी सरपंच हरिभाऊ माने प्रहार संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे तसेच उपसरपंच समाधान मस्के,गरामपंचायत सदस्य दिपक आरे,ग्रामपंचायत सदस्य .अरविंद नाईकवाडे .बालाजी नाईकवाडे .नितीन मस्के,.संतोष माने केवडचे .सत्यवान लटके भाऊ पाटेकर वैभव नाईकवाडे व अनेक ग्रामस्थ व पोलीस प्रशासनातील अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज