अंगणवाडी आहे पण जागाच मिळेना वेळापूर ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार

प्रतिनिधी :-सुमित्रा नगर वेळापूर या ठिकाणी अंगणवाडीसाठी जागा नसल्याने मुलांना खाजगी जागेमध्ये व झाडाखाली बसून शिकवलं जात आहे. भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण झाली परंतु आजही शिक्षण घेण्यासाठी मुला मुलींना रस्त्यावर बसावं लागत असेल वेळापूर सारख्या तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायत मध्ये अंगणवाडी साठी जागा मिळत नसेल तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय आहे. वेळापूर ग्रामपंचायतीस दि १९/१०/२०२२ 22 रोजी मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून निवेदन अर्ज दिला होता परंतु आजही त्या पत्राचे कोणतेही उत्तर आम्हाला मिळालेले नाही तसेच अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते परंतु आजही जागा मिळाली नाही उत्तरे त्यावेळचे प्रभारी ग्रामसेवक गोरे साहेब यांनी प्रस्थापित व्यवस्थेला हाताशी धरून दिशाभूल केली आहे. 

शासकीय कर्त्यव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनयम २००५ अन्वये नागरिकाची सनद प्रमाणे माझ्या अर्जावर निर्णय घेण्यास विलंब झाल्या असल्यास जबाबदार सक्षम अधिकाऱ्यास कायद्यानुसार शास्ती व दंड करावा.व त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी.पत्रावर कारवाई करून ७ दिवसाच्या आत उत्तर कळवावे तसेच सुमित्रा नगर मधील अंगणवाडी लवकरात लवकर जागा मिळावी अन्यथा पंचायत समिती कार्यालयात 20 नोव्हेंबर रोजी “जबाब दो” आंदोलन केले जाईल याची दक्षता घ्यावी असे निवेदन मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी गुळवे साहेब यांना देण्यात आले. यावेळी मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे ,जिल्हा महिला अध्यक्ष निताताई सुळे ,तालुका अध्यक्ष संजय वाघमोडे, तालुका उपाध्यक्ष शंकर मस्के व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज