देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा व कामकाजाचा आढावा मांडणार्‍या भारत सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचे अकलूज नगरपरिषदेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले

अकलूज : येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा व कामकाजाचा आढावा मांडणार्‍या भारत सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचे अकलूज नगरपरिषदेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. या यात्रेतील डिजीटल स्क्रिनच्या रथाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील व अकलूज चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. 

 

यावेळी किशोरसिंह माने पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, उपमुख्याधिकारी जयसिंह खुळे, डॉ.चिराग व्होरा, डॉ.निखिल गांधी, डॉ.सौरभ गांधी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी करून केंद्र सरकार राबवत असलेल्या व अकलूज नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी अकलूज नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 109 घरकुल, रमाई आवास योजना अंतर्गत 13 घरकुल चे वाटप शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मोफत आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत गोल्डन कार्ड योजना, आभा कार्ड योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, आधार कार्ड अपडेट करणे इत्यादि योजना मोफत ठेवण्यात आल्या होत्या.त्यामध्ये नेत्रचिकित्सा 135 लोकांची करण्यात आली त्यात 11 मोतिबिंदू शस्त्रक्रिया निदान करण्यात आले. आरोग्य शिबीर मध्ये 105 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

 

दरम्यान माळेवाडी अकलूज सावतामाळी मंदिर परिसर येथेही विकसीत भारत संकल्प यात्रा रथ दुपारी 04.00 वाजता लावण्यात आला. सदर ठिकाणी माजी जि. प. सदस्या श्रीमती सुनंदा ताई फुले, माजी सरपंच जालिंदर भाऊ फुले, नामदेव गलांडे, भारत फुले, जयदीप एकतपुरे, अरुण खंडागळे व सर्व नगरपरिषद अधिकारी कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कर अधिकारी राजाराम नरूटे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकलूज नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक श्रीमती अभिलाषा निंबाळकर, शहर अभियंता धोंडिराम भगनुरे, कर निरीक्षक बाळासाहेब वाईकर, मिळकत व्यवस्थापक सुनिल काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज