विकसीत भारत संकल्प याञा रथाचे कुर्डुवाडी शहरात स्वागत

प्रतिनिधी (कुर्डूवाडी):- केंद्रातील मा.नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारकडून देशातील नागरीकांना दिल्या जाणाऱ्या विविध विकास योजना गोरगरीब, शोषित, वंचित, शेतकरी वर्गास माहीती व्हाव्यात, योजनांची माहीती तर व्हावीच त्यांचा प्रत्यक्ष लाभही घेता यावा यासाठी हा विकास रथ जिल्हाभर प्रवास करीत आहे. आपल्या सोलापुर जिल्ह्यातुन या रथाचा प्रवास चालु आहे.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रशाला कुर्डुवाडी येथे ही रथयाञा दाखल झाला.प्रथम भारतमातेच्या व भारतरत्न मा.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

तसेच या विकास रथाचे स्वागत समस्त कुर्डुवाडीकर नागरिकांच्या वतीने करण्यात आले.नगरपरीषद कुर्डूवाडीच्या वतीने प्रधानमंञी आवास योजना,प्रधान मंञी स्वनिधी योजना,PM विश्वकर्मा योजना,आयुष्यमान भारत योजना,मुद्रा योजना,आरोग्य शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आशा वर्कर्स, अंगनवाडी सेविका, उज्ज्वला गॅस नोंदणी कर्मचारी यांनी या वेळी ऊपस्थीत नागरीकांना या सर्व योजनेची माहीती दिली.काही नागरीकांना या शिबीरावेळी काही योजनाचा लाभ मिळवुन दिला.काही लाभार्थी या वेळी ऊपस्थीत होते त्यांनी ही या वेळी आपले मनोगत व्यक्त करुन क्रेंद्र शासनाचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानले.

या वेळी केंद्र सरकाराच्या योजना विषयी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ऊमेश पाटील,भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य सुधिर भाऊ गाडेकर यांनी माहिती दिली.

कुर्डुवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी या प्रसंगी केंद्र शासनाच्या विविध योजनेचा आढावा सांगीतला तसेच अनेक योजनांची माहीती दिली.नागरीकांनी सर्व योजनेचा लाभ घ्यावा असे अवाहन यावेळी नागरीकांना केले.

या प्रसंगी भाजपा प्रांतीक सदस्य गोविंद आबा कुलकर्णी,महात्मा फुले महाविद्यालयांचे प्राचार्य सोनवणे सर,भाजपा जिल्हा ऊपाध्यक्ष अमोल कुलकर्णी,महीला शहरअध्यक्षा प्रतिक्षा गोफणे,बालाजी गायकवाड,भाजपा शहर महिला ऊपाध्यक्षा स्वाती गोरे,पदमावती दातार,अंजना कांबळे,शार्दुल दातार,सागर गोफणे यांचेसह भाजपा पदाधिकारी ऊपस्थीत होते.

या कार्यक्रमासाठी नोडल ऑफिसर अतुल शिंदे,नितीन आखाडे,खटके साहेब,जयसिंग लोखंडे,सुरेश कदम,शिवाजी खवळे,राजु चोपडे यांचेसह नगरपरीषद कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

OS रविंद्र भांबुरे यांनी या वेळी सर्वांचे आभार मानले.

यावेळी लाभार्थी तसेच नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज