महेश शिंदे यांना “विशेष संस्थात्मक मतदार मित्र पुरस्कार २०२४” ने सन्मानित करण्यात आले

प्रतिनिधी :- अकलूज या ठिकाणी वास्तव्य करत असलेले मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते महेश शिंदे यांना यावर्षीचा विशेष संस्थात्मक मतदार मित्र पुरस्कार 2024 तहसील कार्यालय,माळशिरस या ठिकाणी सन्माननीय सुरेश शेजुळ साहेब (तहसिल माळशिरस विभाग) यांच्या हस्ते सत्कार करून पुरस्कार सन्मानित करण्यात आला.

महेश शिंदे हा भटक्या विमुक्त जाती जमाती मधील गोंधळी समाजाचा असून भटका विमुक्त जाती जमातीच्या बांधवांकरिता सरकारी योजना मिळाव्यात सरकारी योजनेचा लाभ व्हावा याकरिता सत्तेत कार्यशील व प्रयत्नशील असतात. गेल्या काही महिन्यापूर्वी भटक्या विमुक्त जाती जमाती मधील बांधवांचा जातीच्या दाखल्याचा प्रश्न त्यांनी पाठपुरावा करून सोडवला होता तसेच मतदान कार्ड व रेशन कार्ड हा सुद्धा प्रश्न त्यांनी सोडवला आहे.भटक्या विमुक्त जाती जमाती मधील बांधवांच्या प्रति त्यांची असणारी तळमळ व त्या घटकांसाठी काम करत असताना प्रशासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन माळशिरस तहसील कार्यालयाच्या वतीने सन 2023 मध्ये मतदार नोंदणी वगळणी दुरुस्ती तसेच त्यासाठी राबवले नाविन्यपूर्ण उपक्रम यासाठी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून महेश शिंदे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या विषयावर महेश शिंदे यांना विचारतात त्यांनी सांगितलं की “हा पुरस्कार मी बहुजन समाजाचे ज्येष्ठ नेते विकास दादा धाईंजे व वैभव जी गीते साहेब यांना प्रदान करतो यांच्या मार्गदर्शनामुळे भटक्या-मुक्तातील बांधवांसाठी काम करण्याची ऊर्जा निर्माण झाली.महेश शिंदे यांनी तहसील कार्यालय यांचे मनापासून धन्यवाद मानले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज