भविष्यात सर्व सोयीयुक्त वृद्धाश्रम उभारणार-जुल्कर शेख

प्रतिनिधी :- अकलूज येथील लोकनेते प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते जुल्कर शेख यांचा वाढदिवस अकलूज परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे रूग्णांना फळे वाटप तसेच बज्मे अन्वारे सुफिया मदरसा,अकलूज येथे फळे व धान्य वाटप करण्यात आले. याचबरोबर गोविंद वृद्धाश्रम टेंभुर्णी येथे मिष्टान्न भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.येत्या काळात सामाजिक कार्याच्या जोरावर समाजातील दुर्लक्षित निराधार वृद्धांसाठी सर्व सोयीयुक्त वृद्धाश्रम उभा करण्याचा मानस यावेळी जुल्कर शेख यांनी व्यक्त केला.

वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील,आण्णासाहेब शिंदे,आण्णासाहेब इनामदार,सतीश पालकर,फिरोज देशमुख,जावेद बागवान,विकास धाईंजे,अजय सकट,दादा नामदास,महेश शिंदे,जावेद बागवान,बाळासाहेब पराडे पाटील,ॲड.वजीर शेख,गौरव एकतपुरे,मिलींद सरतापे,किरण धाईंजे,प्रा.नरेंद्र भोसले,नवनाथ साठे,मयुर माने,अब्बास शेख,शैला गोसावी,किरण महाराज जाधव,दिपक पिंजारे , अक्षय शेळके,मोहसीन बागवान यांसह परिसरातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज