शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रिडा मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय कुस्ती व त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धाचे आयोजन

प्रतिनिधी :-श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील उर्फ आक्कासाहेब यांची जन्मशताब्दी तसेच जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मदनसिंह शंकरराव मोहिते- पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या वाटचालीनिमित्त शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रिडा मंडळ,शंकरनगर-अकलुज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय कुस्ती व त्रिमुर्ती केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजीत करण्यात आले आहे.अशी माहिती प्रताप क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील व कुस्ती स्पर्धेचे प्रमुख संयोजक सयाजीराजे मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रिडा मंडळ,शंकरनगर-अकलुज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ ते ०१ डिसेंबर  २०२३ या कालावधीमध्ये श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते- पाटील उर्फ आक्कासाहेब यांची जन्मशताब्दी तसेच जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मदनसिंह शंकरराव मोहिते- पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या वाटचालीनिमित्त दिनांक २९,३० नोव्हेंबर २०२३ व ०१ डिसेंबर २०२३ रोजी शिवतिर्थ आखाडा,शंकरनगर-अकलूज येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती व त्रिमुर्ती केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यातील पहिल्या कार्यक्रमास अर्जुन पुरस्कार प्राप्त जागतीक दर्जाचे कुस्ती खेळाडू माजी आय.पी.एस.अधिकारी पै. कर्तारसिंग यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिले आहे कुस्ती स्पर्धेचे प्रमुख संयोजक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील,राष्ट्रकुल स्पर्धा विजेते राम सारंगसाहेब त्याच प्रमाणे संस्थेचे संचालक वसंतराव जाधव व उमेश भिंगे यांच्या वतीने स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले असून पै.कर्तारसिंग यांनी हे निमंत्रण स्विकारले आहे व या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची सहमती दर्शविली आहे.अशी माहिती प्रताप क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील व कुस्ती स्पर्धेचे प्रमुख संयोजक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज