युवा सेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन सोलापूर जिल्हा तात्काळ दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा- युवा सेनेची मागणी

 

प्रतिनिधी :-युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे, युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने व युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख अशोक भाऊ घोंगडे ,शिवसेना उपतालुका प्रमुख महादेव बंडगर, युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके, दत्ता साळुंखे, रुपेश लाळगे, युवा सेना विधानसभा तालुका प्रमुख मयूर सरगर, शिवसेना शहर प्रमुख अशोक देशमुख यांच्या उपस्थित युवा सेनेच्या वतीने माळशिरस येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात सध्या पाऊस पडला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जर अजूनही पाऊस पडला नाही तर मात्र शेती आणि शेतकरी सगळ्यांत आधी कोलमडून पडेल. त्या मुळे शासनाने ताबडतोब दुष्काळ जाहीर करावा.पावसाळ्यात सलग दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ पाऊसात खंड पडला आणि त्यामुळे पिकांवर परिणाम झाला तर , तसेच आणेवारी किंवा पैसेवारी, त्या हंगामात झालेल्या पेरणीचे प्रमाण ,चाऱ्याची परिस्थिती,जमिनीवरील आणि जमिनीखालील पाण्याची परिस्थिती ,लागवडीचे क्षेत्र,सरासरीच्या पेक्षा कमी पाऊस झाल्यास,या सारखे तांत्रिक निकष तपासून , दुष्काळ जाहीर करणे गरजेचे असताना, प्रत्यक्षात मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.शासनाला युवासेनचया वतीने आमची मागणी एवढीच आहे की भिमा नदीत तात्काळ पाणी सोडावे.उजनी धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीला पाणी सोडावे.शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे.कृषी पंपाच्या वीज बिल माफ करावे. जनावरांसाठी व शेळ्या मेंढ्याना चारा डेपो सुरू करावे.

आ‌वश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर पुरवठा करण्यात यावा. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करावे.आमची शासनाला विनंती आहे की अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी आत्महत्या करतील आणि दुष्काळामुळे शेती आणि शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण अर्थचक्र कोलमडून जाईल.हे सूरळीत चालू ठेवायचे असेल तर कोणताही विलंब न लावता आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा येणाऱ्या काळात युवा सेनेच्या वतीने मोठें जन आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी अक्षय राजेंद्र पराडे , अविनाश पराडे ,रामभाऊ कचरे,कविराज पराडे, अनिकेत पराडे ,सचिन पाटोळे ,माऊली निकम,अक्षय पराडे, अभिजीत गायकवाड, विकास भोई ,गणेश गायकवाड ,अविनाश भोई ,विशाल पाटोळे ,ओम गायकवाड ,आदित्य भोई, हनुमंत पाटोळे ,राहुल चव्हाण युवा सेना शहर प्रमुख देवा लोखंडे , जीवन लोखंडे ,अर्जुन लोखंडे, अजय नाईकनवरे, सुनील मिसाळ , बबलू जगताप ,प्रशांत ढेबरे, सागर तांबडे, लाला सावंत, संतोष वझे, सोमा ढगे, संतोष मोटे ई. शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज