दोन दिवसात भीमा नदीकाठचा विद्युत प्रवाह सुरळीत करा अन्यथा युवा सेनेच्या वतीने जनावरे अकलूज च्या महावितरण कंपनी मध्ये आणून बांधू – गणेश इंगळे

प्रतिनिधी : युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाने आणि युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सोनू भैय्या पराडे पाटील, युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना उपतालुकाप्रमुख दत्ता साळुंखे यांच्या उपस्थितीत अकलूज महावितरण कंपनीचे अधिकारी अण्णासाहेब काळे यांना निवेदन देण्यात आले.

सध्या भीमा नदीमध्ये उजनी धरणातून पाणी सोडले असल्यामुळे नदीकाठचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. शेतातील पिके होरपळून चालेली आहेत . भीमा नदीचे पाणी औज बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी अजून दहा दिवस लागत आहेत . या दहा दिवसांमध्ये उरलेसुरलेली सुद्धा पिके जळून जातील ,यामुळे तात्काळ भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा युवासेनेच्या वतीने अकलूज महावितरण कंपनीमध्ये जनावरे आणून बांधण्याचा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे देण्यात आलेला आहे. यावेळी चंदू नाना पराडे, गणेश भिताडे ,लावा पराडे ,ओम पराडे ,अक्षय पराडे ,विकास भोई, आप्पा भोई ,ओम पराडे, तुषार राऊत, निखिल देशमुख, अर्जुन लोखंडे, अक्षय नाईकनवरे ,अविराज पराडे ,माऊली पराडे, अविनाश पराडे ई. शेतकरी ,शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज