युवा सेनेने केले पाटबंधारे खात्याच्या विरोधात मडके फोडो आंदोलन

पाटबंधारे खात्याने 20 दिवसात वाफेगांव बांधाऱ्यास नवीन दरवाजे उपलब्ध करून न दिल्यास पाटबंधारे खात्याच्या समोर अमरण उपोषण करण्यात येईल असा ईशारा दिला आहे- गणेश इंगळे युवा सेना जिल्हा प्रमुख

प्रतिनिधी :शिवसेना युवा सेना सचिव वरून सरदेसाई यांच्या आदेशाने युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे व युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे युवा सेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोनू भैय्या पराडे पाटील व बाभुळगावचे सरपंच भुषण भैय्या पराडे पाटील यांच्या वतीने माळशिरस तालुक्यातील वाफेगांव येथील बंधाऱ्यास तात्काळ नवीन दरवाजे बसवून बंधाऱ्याची गळती तात्काळ थांबण्यात यावी यासाठी पाटबंधारे खात्यास जाग येण्यासाठी भिमा नदीत पाण्याचे मडके फोडून निषेध वेक्त करून मडके फोडो आंदोलन करण्यात आले .युवा सेनेने पाटबंधारे खात्यास वारंवार मागणी करण्यात आली होती की वाफेगांव येथील बांधाऱ्यास 783 दरवाजे व शिल्लक 10 टक्के कोटा असे मिळून 861 दरवाज्याची मागणी केली होती परंतु पाटबंधारे खाते झोपीच सोंग घेत आहे बांधाऱ्यास दरवाजे उपलब्ध करून देत नाही त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे सध्या माळशिरस तालुका व माढा तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर आहे बंधाऱ्याची दरवाजे जीर्ण झालेले आहेत त्यामुळे बांधाऱ्यातील पाण्याची गळती होऊन बंधारा कोरडा पडू शकतो त्यामुळे आसपासचे गावातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईस सामोरे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे वाफेगांव बांधाऱ्यास तात्काळ नवीन दरवाजे उपलब्ध करून दरवाजे बसवण्याची युवा सेनेने मागणी केली आहे .यावेळी पाटबंधारे खात्याचे अनिल बोचरे यांनी निवेदन स्विकारले यावेळी शिवसेना विधानसभा तालुका अध्यक्ष महादेव बंडगर सुभाष काकडे दत्ता साळुंखे सहदेव पवार साधू मिस्कीन अमरशिंह पवार आबा नागणे हनुमंत अनपट गोविंद भोसले राहुल कुलकर्णी अशोक देवकर अमोल पवार दादा घाडगे रामदाशी पत्रकार यश भगत सागर भोसले अतुल गळगुंडे समाधान चव्हाण मारुती जाधव सुरेश जाधव दत्ता कामटे टीलाराजे इंगळे दादा यादव महादेव गायकवाड दीगा देवकर धनाजी घोडके प्रदीप मिसाळ विठ्ठल पाटोळे सचिन पाटोळे माऊली निकम नागेश लोकरे पपू लोकरे शुभम मिस्कीन चंदू पराडे तानाजी पराडे जयेश पराडे शंकर पराडे समाधान पराडे कविराज पराडे अविनाश पराडे सचिन पराडे प्रशांत पराडे ओम पराडे पपू इंगळे अक्षय पराडे विकास भोई अविनाश भोई युवराज गोरे भैय्या गायकवाड इ शेतकरी बांधव उपस्थित होते 

 

 

पाटबंधारे खात्याने 20 दिवसात वाफेगांव बांधाऱ्यास नवीन दरवाजे उपलब्ध करून न दिल्यास पाटबंधारे खात्याच्या समोर अमरण उपोषण करण्यात येईल असा ईशारा दिला आहे- गणेश इंगळे युवा सेना जिल्हा प्रमुख

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज