युवा सेनेच्या मडकी फोडो आंदोलनानंतर वाफेगांव बेंबळे बंधाऱ्यातील होणारी पाणी गळती तात्काळ बंद करण्यात आली

वाफेगांव बेंबळे बंधाऱ्यास पाटबंधारे खात्याने जर 20 दिवसात नवीन 783 दरवाजे प्लस रिजर्व कोटा 10 % दरवाजे न दिल्यास युवा सेनेच्या वतीने जलसमाधी घेऊ असा ईशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे .

गणेश इंगळे -युवा सेना जिल्हा प्रमुख

 

प्रतिनिधी :शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे व सोलापूर जिल्हा युवा सेना संपर्कप्रमुख उत्तम ऐवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे युवा सेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोनू भैय्या पराडे पाटील, बाभुळगावचे सरपंच भुषण भैय्या पराडे पाटील यांचे अधिपत्याखाली संगम, बाभुळगाव, वाफेगाव, बेंबळे, शेवरे, वाघोली, मिटकलवाडी ,माळेगाव इत्यादी गावा- तील शेतकऱ्यांनी युवासेनेच्या नेतृत्वाखाली वाफेगाव- बेंबळे बंधाऱ्यास भक्कम दरवाजे द्या. तसेच पाणी गळती बंद करा ,यासाठी पाटबंधारे खात्याच्या विरोधात भिमा नदीत येऊन मडके फोड आंदोलन केले होते. याची तातडीने दखल घेऊन अवघ्या एकच दिवसात पाटबंधारे खात्याचे उपविभागीय अधिकारी कल्याणराव माने – देशमुख व कनिष्ठ अभियंता श्रीपुर शाखेचे काळे यांनी व तसेच कालवा निरीक्षक ज्ञानेश्वर बेडकुते या सर्वांनी मजुरांच्या साह्याने पाण्याची संपूर्ण गळती बंद केली .तसेच या बंधाऱ्यासाठी आगामी थोड्याच काळात भक्कम दरवाजे आणून बसवण्यात येतील असेही सांगण्यात आले.

पाणी गळती बंद झाल्यामुळे वाफेगाव बेंबळे बंधाऱ्यातील पाण्याचा वापर संगम बाभळगाव वाफेगाव बेंबळे माळेगाव मिटकलवाडी वाघोली शेवरे इत्यादी गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी घेण्यास व पिण्यासाठी पाणी आगामी दोन महिने तरी कमी पडणार नाही.त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे .

 

वाफेगांव बेंबळे बंधार्यास पाटबंधारे खात्याने जर 20 दिवसात नवीन 783 दरवाजे प्लस रिजर्व कोटा 10 % दरवाजे न दिल्यास युवा सेनेच्या वतीने जलसमाधी घेऊ असा ईशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे .

गणेश इंगळे -युवा सेना जिल्हा प्रमुख

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज