युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे यांच्या मार्फत दिवाळीनिमित्त मोफत सुगंधी उटणे वाटप

प्रतिनिधी (मुंबई ):- उटण्याचा पवित्र सुगंध घेऊन, आली दिवाळीची पहाट, शिवसेनेच्या मशालीच्या तेजाने, उजळेल महाराष्ट्राची वहिवाट !!

शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष, युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे यांच्या मार्फत सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्व दिवाळीनिमित्त मोफत सुगंधी आयुर्वेदिक उटणे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आदरणीय शिवसेना नेते – युवासेनाप्रमुख, आमदार श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते मातोश्री येथे संपन्न झाला. या समयी शिवसेना सचिव श्री. साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख श्री. महेश सावंत, महिला विभागसंघटक, माजी महापौर सौ. श्रद्धा जाधव, विधानसभा संघटक श्री. विठ्ठल पवार, वसंत नकाशे, ॲड. मेराज शेख, शाखाप्रमुख हमीद शेख आदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज