लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांची दिशाभूल करून उजनीचे कालव्यातील आवर्तन लांबवले युवासेनेचा आरोप : उजनीतील 47 टक्के पाणी केवळ 90 दिवसातच संपवले

प्रतिनिधी : युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व सचिन बागल युवा सेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या वतीने उजनी धरणावरी बोंबा बोंब आंदोलन करण्यात आले व कालव्याचे पाणी दोन दिवसात तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा दोन दिवसात पाणी नाही बंद केले तर युवा सेना जलसमाधी घेणार असा ईशारा देण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची दिशा भूल करून उजनी कालव्याचे आवर्तन लांबवले.यंदा उजनी धरण हे 66 टक्के भरलेले होते .उजनी धरणाचे नियोजन शून्य कारभारामुळे व लोकप्रतिनिधींच्या मनमानीमुळे नव्वद दिवसात उजनी धरण हे 47 टक्के संपले . आता फक्त 19 टक्केच पाणी साठा शिल्लक राहिला आहे .12 लाख एकर क्षेत्राला फेब्रुवारी व मार्चला रब्बी पिकासाठी मिळणारे दुसरे आवर्तनाच्या आशा आता मावळू लागल्या आहेत . पहिले आवर्तन हे 1 नोव्हेंबर ला सोडलेले पाणी 30 नोव्हेंबरला बंद करण्याचे ठरवले असताना ते आज आखेर डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा संपत आला तरी आज तागायत पाण्याचे आवर्तन चालू आहे .लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या मुळे लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांची दिशाभूल करून स्वतः ची पोळी भाजून घेत आहेत .डिसेंबर आखेर सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडणार आहेत. त्यावेळी पाच ते सहा टीएमशी पाणी कमी होऊन धरण मायनस च्या जवळ पोहचणार आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.याचं पद्धतीने पाण्याचा वापर झाला तर उजनी धरण लवकरच मोकळे होणार आहे.त्यामुळे परिणामी येथील शेतकऱ्यांची शेती धोक्यात येणार आहे .शेतकऱ्यांना पिके जगवण्यासाठी तारेवरची कसरत करत संघर्ष करावा लागणार आहे.सद्या हिवाळ्याचे दिवस असतानाही पाणी पातळी झपाट्याने कमी होत चालली आहे .धरणातील पाणी साठा हा 19 टक्के वर आहे याचं महिन्यात याचं तारखेला गेल्या वर्षी उजनी धरणातील पाणी साठा हा 108 टक्के होता.परंतु सद्यस्थितीत पाणी पातळी अल्प प्रमाणात आहे.भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात उजनी लाभक्षेत्रातील ऊस केळी फळबागांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे .त्यामुळे आताच शेतकरी चिंता ग्रस्त झाला आहे.शेतकऱ्यांनी उजनी धरणासाठी कसदार जमिनी दिल्या वसलेली गावेच्या गावी दिली परंतु प्रकल्प ग्रस्तांना विचारात न घेताच उजनीच्या पाण्याचे नियोजन केले जाते. हे निवेदन आर सी मोरे कार्यकारी अभियंता व येन आर आल्हाट उपकार्यकारी अभियंता यांनी स्विकारले यावेळी युवासेना तालुका सरचिटणीस सोमनाथ ढवळे, शुभम फुगे अशोक माने, विठ्ठल आबा मस्के, रणजित पवार, गुणा वाघ, विनोद निर्धार ,ओम पराडे ,युवराज पवार ,सागर साळुंखे, सुरज जाधव ,जीवन राऊत,  सुनील ढगे ,श्रीकांत मासुळे, युवा सैनिक तेजस निंबाळकर ,युवराज गोरे ,प्रवीण झिंगे ई. शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित उजनी

 

उजनी कालव्याचे पाणी दोन दिवसात तात्काळ बंद नाही केले तर युवा सेना उजनी धरणार जलसमाधी घेणार असा ईशारा युवा सेनेच्या वतीने गणेश इंगळे, सचिन बागल, किशोर देशमुख यांनी दिला आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज