युवा सेनेच्या तहसील माळशिरस तहसील समोर बोंबा बोंब आंदोलन

प्रतीनिधी : शिवसेना युवा सेना सचिव वरुण सरदेसाई युवासेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख उत्तम ऐवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, युवासेना उपतालुकाप्रमुख दूर्वा अडके यांच्यावतीने माळशिरसचे नायब तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन देण्यात आले व कारखानदारांकडून शेतकऱ्यांची पाणीपट्टी कपात त्वरित थांबवण्यात यावी व जे कारखानदार पाणीपट्टी वसूल करत आहेत अशा कारखानदारांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

माळशिरस तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर आहे. दुष्काळग्रस्त जाहीर तालुक्यात शासन नियमानुसार शेतकऱ्यांची पाणीपट्टी , बँक सोसायटी कर्ज हे कोणत्याच प्रकारे कपात केले जात नाही. दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी युवा सेनेच्या वतीने तहसीलदार यांना पत्रव्यवहार करून ही बाब निदर्शनास आणून दिली होती की, कारखानदार आणि बँका सक्तीने शेतकऱ्यांचे पाणीपट्टी व सोसायटी कपात करत आहेत तरी ते त्वरित थांबवण्यात यावी. परंतु कारखानदाराने यास केराची टोपली दाखवली कारखानदाराने पाटबंधारे खात्यास पाणीपट्टी शेतकऱ्यांची वसुली करून दिल्यानंतर कारखानदारास कमिशन भेटते. म्हणून कारखानदार पाणीपट्टी शेतकऱ्यांची कपात करून पाटबंधारे खात्यास देत आहेत. कारखानदारास कमिशन मिळत असल्यामुळे ते शेतकऱ्यांवरती दुष्काळात अन्याय करत आहेत. त्यामुळे युवासेनेच्या वतीने बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता माळशिरस तहसील समोर भिक मागो आंदोलन करण्यात येईल व व जी रक्कम जमा होईल ती रक्कम कारखानदारास तहसीलमार्फत कमिशन म्हणून देण्यात येईल असा इशाराही युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. ज्या कारखानदारांनी पाणीपट्टी कपात केली आहे अशा कारखानदारांवरती त्वरित कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे .यावेळी निवेदन देताना युवा सेना विधानसभा तालुका प्रमुख मयूर सरगर, युवासेना उपतालुका प्रमुख दत्ताभाऊ साळुंखे, युवा सेना उपशहर प्रमुख युवराज पवार, गणेश भिताडे, सागर साळुंखे, माऊली पराडे, कविराज पराडे ,विकास महाडिक ,अजित नगरे इत्यादी युवा सैनिक उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज