31 डिसेंबरला उजनी धरणावर युवा सेना घेणार जलसमाधी आंदोलन

 प्रतिनिधी :-शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई, युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व सचिन बागल युवा सेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख व युवा सेना माळशिरस तालुका व माढा तालुक्यातील युवा सेनेचे पदाधिकारी उजनी धरणावर रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता जल समाधी आंदोलन घेणार आहेत. उजनी धरणातून 1 नोव्हेंबर ला कालव्याला सोडलेले पाणी 1 डिसेंबर ला बंद करण्याचे पाणी नियोजन बैठकी मध्ये ठरलेले असतानाही ते पाणी आज तागायत बंद केले नाही . पाणी बंद करण्यासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना जाग येण्यासाठी युवा सेनेच्या वतीने 23 डिसेंबर रोजी उजनी धरणावर बोंबा बोंब आंदोलन करण्यात आले होते परंतु या आंदलानातून यांना जाग आलीच नाही .

       आगामी लोकसभा व विधानसभा तोंडावर आल्या मुळे राजकीय पुढाऱ्यांनी उजनी धरणाचा राजकीय अड्डा करून ठेवला आहे त्यामुळे धरणग्रस्तांवरती अन्याय होत आहे .

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज